Wakad : गांजा विक्री प्रकरणी महिलेस अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या (Wakad)महिलेला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. महिलेकडून दोन किलो 40 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 21) दुपारी वाकड येथे करण्यात आली.

आरती अजय चव्हाण (वय 35, रा. बालेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात एक (Wakad)महिला गांजा विक्रीसाठी आली असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून महिलेस ताब्यात घेतले.

Sunandan Lele : क्रिकेट आपल्याला सजगता आणि सातत्याने क्रियाशील राहणे शिकविते – सुनंदन लेले

तिच्याकडून दोन किलो 40 ग्रॅम वजनाचा दोन लाख चार हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. तिने हा गांजा परशुराम तुपेरे (रा. वाकड) याच्याकडून आणला असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी परशुराम तुपेरे याच्या विरोधात देखील गुन्हा नोंदवला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.