Pune : श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्त सर्व भाषिकांची भव्य शोभा यात्रा

एमपीसी न्यूज – प्रभू श्री राम मंदिर लोकार्पण (Pune) सोहळ्यानिमित्त श्री राम ग्रुप तसेच कसबा पेठेतील 18 मंडळांनी एकत्र येत शोभा यात्रा काढली. सर्वधर्मीय शोभा यात्रेत पंजाबी , बंगाली, केरळी, ओडिसी राजस्थानी, गुजराती इत्यादी समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली. सोन्या मारुती चौकात सुरू झालेल्या या शोभा यात्रेचा समारोप फडके हौद या ठिकाणी झाला. विधिवत पूजा अर्चा श्री राम पूजनानंतर अयोध्येतील श्री राम मंदिराच्या लोकार्पण सोहळा थेट प्रक्षेपित करण्यात आला.

या वेळी नागरिकांना प्रतिकात्मक हत्तीवरून साखर वाटण्यात आली. या यात्रेत प्रभू रामचंद्र सीता माता लक्ष्मण हनुमानाच्या वेशभूषेतील कलाकारांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

Wakad : गांजा विक्री प्रकरणी महिलेस अटक

या शोभा यात्रेत भारतीय जनता पार्टीचे कसबा मतदारसंघाचे (Pune) निवडणूक प्रमुख हेमंत रासने, भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गटाचे) गणेश नलावडे, शिवसेना (ठाकरे गट) निलेश राऊत यांच्यासह सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी सहभागी झाले होते. या यात्रेचे संयोजन श्री राम ग्रुप, अरविंद कोठारी, पुष्कर तुळजापूरकर, कौशिक कोठारी व मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.