Shirur : अल्पवयीन मुलांची बाईक राईड बेतली जीवावर; दोन दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- अल्पवयीन मुलांची बाईक राईड दोन मुलांच्या जीवावर घेतली. दोन (Shirur ) दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. शिरूर जिल्ह्यातील वाडा गाव पुनर्वसन येथील वाडगाव ते डिग्रज वाडी रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

 

महादेव दत्तात्रय कांबळे (वय 14) आणि सिद्धेश शिंदे (वय 17) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. तर ओमकार चंद्रकांत कंधारे हा तरुण या अपघातात जखमी झाला आहे. शिक्रापूर पोलिसांनी या अपघात प्रकरणी ओमकार कंधारे या दुचाकी चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Nigdi : दुर्गा टेकडीवर बहरलेल्या करवंदांना शहरीकरणाचा फटका, फुले व फळ धारणेचे प्रमाण कमी

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की वाडा गाव डिग्रज वाडी येथील रस्त्यावरून महादेव कांबळे आणि सिद्धेश शिंदे हे दोघे दुचाकीने भरधाव वेगाने जात होते. त्याचवेळी ओमकार खंदारे हा तरुण आपली दुचाकी घेऊन भरधाव वेगाने जात होता. त्या दोघांच्या दुचाकीची समोरासमोर धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महादेव आणि सिद्धेश या दोघांचा मृत्यू झाला. शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू ( Shirur) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.