Shirur : तीन बिबटया बछड्यांची त्यांच्या आईशी भेट घडवण्यात वन विभागाला यश

एमपीसी न्यूज : तीन बिबटया बछड्यांची (Shirur) त्यांच्या आईशी (मादी बिबट्याशी) भेट घडवण्यात वन विभागाला यश आले आहे. शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील शेतकरी सुरेश इंगवले यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोड कामगारांना बिबट्याची चार पिल्ले दिसल्याने खळबळ उडाली होती. याबाबत माहिती त्यांनी शिरूर परिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना दिली.

Pune News : जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

त्यामुळे त्यांनी लगेच वनरक्षक बबन दहातोंडे व वनविभागाच्या इतर कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. त्यांना तेथे बिबट्याची चार पिल्ले दिसली, पण त्यामधील एक पिल्लू मृत होते. म्हसेकर म्हणाले, की बिबट्याची पिल्ले खूपच लहान होती. त्यांनी अजून डोळे पण उघडले नव्हते. त्या ऊस शेतातील ऊस तोड लगेच थांबविण्यात आली. मादी बिबट्या आसपासच असल्याची शक्यता असल्याने रात्री पिल्लांना (Shirur) तेथेच ठेवण्यात आले. मादी बिबट्या रात्री तेथे येऊन त्या पिल्लांना तिच्या सोबत घेऊन गेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.