Pune : मनसेचे सात ते आठ कार्यकर्ते शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या सात ते आठ कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील दुकाने बंद करण्याचा कार्यकर्ते प्रयत्न करीत होते. ही कारवाई आज सोमवारी (दि.10) दुपारी एकच्या दरम्यान करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. पुण्यात देखील या बंदचे पडसाद उमटायला सकाळपासूनच सुरुवात झाली होती. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे आज पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर जंगली महाराज रस्त्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी मनसेच्या सात ते आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी कुमठेकर रस्त्यावर पीएमटी बसवर दगडफेक करत आंदोलनाला सुरुवात केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.