Pune : युएस कीड्स गोल्फच्या युरोपियन स्पर्धेसाठी पुण्याचा श्लोक पात्र

एमपीसी न्यूज – पुण्यातील युवा गोल्फ खेळाडू श्लोक जैन याची युएस कीड्स गोल्फ अंतर्गत युरोपियन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विविध वयोगटातून घेण्यात आलेल्या चाचणीतून निवडण्यात आलेल्या एकूण ३२ मुलांमध्ये श्लोकची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या स्पर्धकांत २० मुले आणि १२ मुलींचा समावेश आहे. हे निवड झालेले खेळाडू आता युरोपातील विविध स्पर्धेत खेळण्यासाठी प्राधान्याने पात्र ठरतील.

या स्पर्धेतील कामगिरीनुसार ते जागतिक स्पर्धेसाठी देखील पात्र ठरतील. अमेरिकेत जन्मलेल्या श्लोकची १२ वर्षांखालील गटात निवड झाली आहे. युएस कीड्स गाोल्फच्या भारत दौऱ्यात सर्वाधिक दोषांक मिळवत त्याने ही पात्रता सिद्ध केली आहे. ब्ल्यू रिजच्या नवव्या ग्रेडच्या स्पर्धेत त्याने बंगळूर, हैदराबाद, नवी दिल्ली आणि पुणे अशा चार स्पर्धेत विदजेतेपद मिळविले आहे. पात्रतेवर शिक्कामोर्तब करताना नवी दिल्ली येथील स्पर्धेत तो तिसरा आला. या कामगिरीने श्लोकने दुसऱ्या क्रमांकाने आपली पात्रता सिद्ध केली. एकूण पाच विभागातून त्याने बर्गंडी  या विभागात पात्रता गाठली. प्लॅटिनम (सर्वाोच्च), ग्रीन, ऑरेंज आणि ब्ल्यू (निचांकी) असे अन्य चार विभाग आहेत. आता अन्य स्पर्धंकाबरोबर श्लोक युएस कीडस जागतिक स्पर्धेसाठी देखील पात्र ठरला आहे.

ही स्पर्धा २५ ते २७ जुलै रोजी नॉर्थ कॅरोलिना येथे होणार आहे. या कामगिरीने आनंदीत झालेला श्लोक म्हणाला, या यशाचे श्रेय मी वडिलांना देतो. ते माझ्या पाठिमागे भक्कमपणे उभे राहिल्याने मी ही कामगिरी करू शकलो. हार असो विजय वडिलांनी कधीच माझे संतुलन ढळणार नाही याची काळजी घेतली. या स्पर्धेत अनेक मुले पात्रता सिद्ध करत आली आहेत. पण, युरोपमध्ये खेळण्याची मुलांना प्रथमच संधी मिळणार आहे. त्यांना भारत आणि आशियाबरोबर युरोपमधील गोल्फ कोर्सवर खेळण्याची संधी मिळणार आहे.

या निमित्ताने मुलांना अव्वल खेळाडूंचा सराव पाहण्याबरोबरच रेनाइसान्स, गुल्लाने, क्रेगलॉ, आर्चरफिल्ड लींक्स सारख्या गोल्फ कोर्सचा अनुभव मिळणार आहे.युएस कीडस इंडियाचे राजेश श्रीवास्तव म्हणाले या मुलांना प्रगतीच्या काळात अधिक मोठ्या आव्हानांचा सामना करता यावा यासाठी तयार करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. स्कॉटिश ओपन सारखी स्पर्धा हाोणाऱ्या कोर्सवर त्यांना खेळायला मिळणार आहे त्यांच्यासाठी हा अनुभव खूप मोठा असेल.

पात्र ठरलेले खेळाडू

मुले सहा वर्षांखालील – प्रिआन कंटवाला (बर्गंडी)सात वर्षांखालील – दर्षित चौरासिया (ऑरेंज), चैतन्य पांडे (बर्गंडी), साओ रायन (ऑरेंज)आठ वर्षांखलील ः मुदीत अगरवाल (ऑरेंज), सोहंग हर कंटार (बर्गंडी)१० वर्षांखालील – प्रशांत अगरवाल (बर्गंडी), आदितक्य खेतान  (ऑरेंज), उदाई आदित्य मिद्धा (ऑरेंज), रणवीर मित्रौ (ब्ल्यू)९ वर्षांखालील – आयन दुबे (ऑरेंज), जय हांडा (ब्ल्यू), भावेश निर्वाण (बर्गंडी), आर्षवंत श्रीवास्तव (ऑरेंज)१२ वर्षांखालील – श्लोक जैन (बर्गंडी)१३ ते १४ वर्षे – जय बहल (घऑरेंज), अंशुल भाटिया (ब्ल्यू) गवर् लखमनी (ब्ल्यू) रमायुश रे (बर्गंडी)५ ते १८ वर्षे – कौशल बग्रोडिया (बर्गंडी), जॉयसुर्जेा डे (ऑरेंज)मुली ः ७ वर्षांखालील ः अनुष्का गुप्ता (ऑरेंज), नयना कपूर (बर्गंडी), ८ ते ९ वर्षे – शांभवी चतुर्वेदी (ब्ल्यू), आयेषा गुप्ता (ऑरेंज), रेहा कुमार (बर्गंडी), प्रणिका शर्मा (ऑरेंज)१० ते ११ वर्षे – पार्थना (ऑरेंज), सेरेना खन्ना (बर्गंडी), पलाक्षी सेहरावत (ऑरेंज)१२ ते १४ वर्षे ः रागिणी नावेत (बर्गंडी)१५ ते १८ वर्षे ः सेरेना विक्रम सिंग (बर्गंडी)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.