Chikhali:शॉर्टसर्किटमुळे टायरचे दुकान जळून खाक

एमपीसी न्यूज – शॉर्टसर्किटमुळे टायर आणि कापसाच्या गाडीचे दुकान जळून खाक झाले. ही घटना आज (बुधवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास मोशी-देहूरोडवर तळवडे येथे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पंडित बोराडे यांचे मोशी-देहूरोड रस्त्यावर कापसाची गाडी आणि टायरचे दुकान आहे. त्या दुकानात दुपारी साडेतीनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कापसाला आग लागल्याने ही आग काही क्षणात भडकली. आगीचे लोट दुकानातून निघू लागले. त्यामुळे बोराडे यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, संत तुकाराम नगर, तळवडे, चिखली आणि भोसरी विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. कापसाला आणि टायरला आग लागल्याने आग विझविण्यास अग्निशमन विभागाला अडथळे आले. तरीही काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दुकान पूर्णपणे जळून गेल्याने दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.