Chikhali : ‘तू काय भाई झालास का’? म्हणत टपरी चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – ‘तू काय भाई झालास का? उद्यापासून तुझी टपरी येथे दिसता कामा नये’ असे म्हणत एकाने टपरी चालकाला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या पाठीत कचराकुंडी फेकून मारली. हा प्रकार चिखलीतील घरकुल कमानीजवळ शुक्रवारी (दि. 31) घडला.

याप्रकरणी विशाल दशरथ शिंदे (वय-23, रा. आशिर्वाद सो. घरकुल, चिखली) याला अटक केली आहे. याबाबत जमिल बाबुमिया शाह (वय 35, रा. चिखली) याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुक्रवारी आरोपी शाहाच्या टपरीवर आला. त्याने शाहाला ‘तू काय भाई झालास का? उद्यापासून तुझी टपरी येथे दिसता कामा नये’ असे म्हणत टपरीतून बाहेर ओढून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या पाठीत कचराकुंडी फेकून मारली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून चिखली पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.