Satyam Jewellers : ‘सोन्यावर चांदी फ्री’, ‘सत्यम ज्वेलर्स’मध्ये दीपावली निमित्त खास ऑफर 

एमपीसी न्यूज – शुद्धतेसाठी वचनबद्ध असलेले सत्यम ज्वेलर्स यांच्याकडे उत्तम कलाकृतीचे दागिने तर मिळतातच शिवाय सोने अस्सल असल्याची गॅरेटीही मिळते. याच सत्यम ज्वेलर्स मध्ये दीपावली निमित्त ‘सोन्यावर चांदी फ्री’ हि खास ऑफर देण्यात आली आहे. ज्यात ग्राहकांनी खरेदी केलेल्या सोन्याच्या वजना एवढी चांदी एकदम फ्री मिळणार आहे. 

सोनेरी दुनियेतील विश्वसनीय तसेच नावाजलेले मूळचे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स म्हणजेच ‘सत्यम ज्वेलर्स’, 1984 पासून ग्राहकाच्या मनावर राज्य करणारे ज्वेलर्स ज्यांच्याकडे सोने, चांदी, हिरे, प्लेटिनम, राशी रत्ने, गिफ्ट आर्टिकल्स यासारखे असंख्य व्हरायटीचे दागिने आपल्याला खरेदी करायला मिळतात. सूवर्णपेढीतील प्रत्येक दागिन्यावर BI5 Hallmark असतो. तसेच प्रत्येक हिन्याच्या खरेदीवर तुम्हाला सत्यम ज्वेलर्स कडून शुद्धतेचे प्रमाणपत्रही मिळते.

ग्राहकांची साथ आणि चोपडा परिवाराची 3 दशकांची अथक मेहनत व प्रयत्न यामुळे सत्यम ज्वेलर्सच्या आज 3 शाखा सेवा देत आहेत आणि कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर मि. राहुल चोपडा याच्या भविष्यातील योजनेनुसार आणखी काही नवीन शाखा ग्राहकांच्या सेवेस लवकरच येणार आहेत. सध्या सुरू असलेल्या निगडी, कृष्णानगर आणि चाकण या शाखांना भरपूर साथ मिळत आहे.

ग्राहकांची आवड, निवड आणि बजेट यावर सत्यम ज्वेलर्सचे बारकाईने लक्ष असते. म्हणून याच्याकडील आभूषणे नेहमीच नवीन डीझाईन्स सह ग्राहकांच्या बजेट मध्येही असतात. ग्राहकांची चांदी बद्दल आवड लक्षात घेता सत्यम ज्वेलर्स यांचे फक्त चांदीच्या विविध प्रकारच्या वस्तूसाठी “सत्यम सिल्वर” नावाचे एक भव्य-दिव्य दुमजली शोरूम निगडी येथे उपलब्ध आहे. त्या दुसजलो भव्य दालनात ग्राहकासाठी खास चांदीची पायल, जोड़वी, पूजा सामग्री, सिल्वर ज्वेलरी, गिफ्ट आर्टिकल्स, सिल्वर कॉइन्स इ. ची आकर्षक व भव्य रेंज उपलब्ध आहे. खास दिवाळीनिमित्त ग्राहक आपल्या मित्रमैत्रिणीना किंवा नातेवाईकांना सणाची भेट म्हणून काहीतरी गिफ्ट देत असतात, त्यासाठी सत्यम ज्वेलर्सकडे भव्य रेंज उपलब्ध आहे ज्यात सिल्वर कॉइन्स, देवी देवाचे फ्रेम्स, सिल्वर पूजा थाली, समई, घड्याळे, सिल्वर कोटेड आइटम्स इत्यादी गिफ्ट आर्टिकल्सचा समावेश होतो.

सदैव सामाजिक आणि ग्राहक हित याचा विचार करणारे सत्यम ज्वेलर्स प्रत्येक वर्षी सणासुदीला काहीतरी वेगळी ऑफर्स घेऊन येतात. ज्यात कधी लकी ड्रॉ तर कधी हमखास गिफ्ट अशा ऑफर्स असतात पण ह्यावर्षी ग्राहकांना हमखास आणि ताबडतोब फायदा व्हावा म्हणून ‘सोन्यावर चांदी फ्री’ हि ऑफर देत आहेत. ज्यात ग्राहकांनी खरेदी केलेल्या सोन्याच्या वजना एवढी चांदी एकदम फ्री मिळणार आहे. अश्या प्रकारचा ताबडतोब मिळणारा फायदा घेण्यासाठी दस-याच्या शुभ मुहूर्ताला सत्यमच्या तिन्ही शोरुमला प्रचंड गर्दी पाहण्यात आली होती. हि ऑफर 9 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील तरी सर्वांनी आवर्जून शोरुमला भेट देऊन या ऑफरचा फायदा घ्यावा.

दिवाळी नंतर येणाऱ्या लग्नसराईला लक्षात ठेऊन सत्यम ज्वेलर्स यांनी खास कलेक्शन सुध्या सर्व शोरुममध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत ज्यात ग्राहकांना लग्नासाठी खास प्रकारचे मंगळसूत्र बांगड्या, नथ, राणीहार, चोकर, बाजूबंद, टेम्पल ज्वेलरी इ. प्रकारची नवीन आणि भरपूर आभूषणे पाहायला आणि खरेदी करायला मिळतील.

लग्नात मान सन्मानासाठी लागणारी सर्व प्रकारचे गिफ्ट आर्टिकल्स सुद्धा तिन्ही शोरूम मध्ये उपलब्ध आहेत. म्हणजेच लग्नासाठी खरेदी करायची तर फक्त सत्यम ज्वेलर्सच्या शाखेतूनच कारण येथे दागिन्यांसोबत दोन्ही परिवाराच्या मान-सन्मानाला सुध्दा महत्व देण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.