Pimpri : पिंपरीत सिंधी बांधवांतर्फे सिंधी भाषा दिन साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील सिंधी समाजबांधवानी (Pimpri) सोमवारी (दि.10) सिंधी भाषा दिन साजरा केला. 10 एप्रिल 1967 साली सिंधी भाषेला देशातील आठवी भाषा म्हणून मान्यता दिली म्हणून 10 एप्रिल हा दिवस सर्व सिंधी समाज  ” सिंधी भाषा दिन ” दिन म्हणून साजरा करतात.

Pune : पुण्यात आंबा महोत्सवातून शेतकऱ्यांचे मोबाईल चोरीला

सिंधी भाषा दिन या कार्यक्रमाचे ” उबाडा “धर्मशाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या समाजातील नागरिकांनी बोलताना वरील माहिती दिली यावेळी अखंड सिंधी समाज संस्थेचे मनोहर जेठवानी, किरण रामनानी, अजित कंजवानी, प्रदिप नाचमन, मनोज पंजाबी, सुशील बजाज, कैलास बजाज, पीतांबर ऐलानी सुशिल पारवानी, शाम शेठ, अंशीराम हरजानी, पुजा मुलचंदानी, पुजा रविना, आबा, अनिता, वर्षा आणि इतर समाजबांधव उपस्थित होते.

10 एप्रिल रोजी या दिवशी सिंधी समाज आपल्या (Pimpri) घरी “कढी चावल आणि डाल पकवान ” बनवून संपूर्ण कुटुंब वेगळा आनंद घेतात. या कार्यक्रमाचे आयोजन “अखंड सिंधी समाज ” च्या वतीने करण्यात आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.