Pune : पुण्यात आंबा महोत्सवातून शेतकऱ्यांचे मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील (Pune) आंबा महोत्सवात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चक्क शेतकऱ्यांच्या मोबाईलवरच हात साफ केला आहे. यात 12 मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात अक्षय अभय थोटम (रा. हुर्शी, ता, देवगड, जि. सिंधुदुर्ग ) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : हवेली, खेड, मावळ, शिरूर तालुक्यात वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्डमध्ये पणन मंडळाकडून आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आंबा महोत्सवात कोकणातील अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकरी स्टॉलजवळ रात्री झोपले होते.

त्यावेळी चोरट्यांनी बारा शेतकऱ्यांचे मोबाईल चोरले. मोबाईल चोरीला गेल्यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी मार्केट यार्ड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास (Pune) सुरुवात केली असून पोलीस उपनिरीक्षक पवार याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.