Bhosari: स्केटिंग ग्राऊंडच्या कामाला गती द्या; आमदार महेश लांडगे यांचे अधिका-यांना निर्देश

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विकसित करण्यात येणा-या भोसरी, इंद्रायणीनगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग ग्राऊंडचे काम वेगात करा. खेळाडूंना सर्व सोयीसुविधायुक्त असे शहरातील पहिलेच ग्राऊंड करण्यात येणार आहे. ग्राऊंडचे काम दर्जेदार करावे.  खेळाडूंना ट्रॅक उपलब्ध करुन देण्यात यावा. पहिल्या टप्प्याचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्यात यावे असे निर्देश भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत. 

महापालिकेतर्फे भोसरी, इंद्रायणीनगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग ग्राऊंड विकसित करण्यात येत आहे. वर्षभरापासून त्याचे काम सुरु आहे. आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी (दि.26)पालिकेच्या अधिका-यांसमवेत कामाची पाहणी केली. त्यावेळी आमदार लांडगे यांनी अधिकाऱ्यांना काम दर्जेदार करण्याबरोबरच विविध सूचना दिल्या आहेत. यावेळी नगरसेविका नम्रता लोंढे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता विजय वाईकर, कनिष्ठ अभियंता राहुल जन्नू, निलेश केदार, वास्तूविशारद पंकज कांबळे, राहुल राणे, योगेश कुमावत, ठेकेदार आनंद निकुंभ, मंदार कुलकर्णी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहाराला खेळाचा मोठा वारसा आहे. इंद्रायणीनगर येथील ग्राऊंड हे शहरातील पहिलेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग ग्राऊंड असणार आहे. त्याचे काम दर्जेदार करण्यात यावे. कामाला वेग देण्यात यावा. खेळाडूंना वेळेत ग्राऊंड उपलब्ध झाले पाहिजे. सीमाभिंतीलगत चोहोबाजूकडून उंच झाडे लावण्यात यावीत. स्त्री आणि पुरुष खेळांडूसाठी स्वच्छतागृह बांधण्यात यावे. चेंजिंग रुम बांधावी. मुख्य प्रवेशद्वार व कमानीचे काम पूर्ण करावे. स्केटिंग रिंगचे कोटींग करण्यात यावे. तसेच नावीन्यपूर्णतेच्या उद्देशाने काही सुविधा देण्यात याव्यात.

पहिल्या टप्प्याचे काम नोव्हेबर अखेर पूर्ण होईल, त्यादृष्टीने काम करण्यात यावे. जेणेकरुन दिवाळीमध्ये खेळांडूंना ट्रॅक उपलब्ध होईल. विविध स्पर्धा घेण्यात येतील, अशा सूचना आमदार लांडगे यांनी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.