SSC Exam : दहावीची पुरवणी परीक्षेच्या अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ( SSC Exam) घेण्यात येणाऱ्या माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अपयश आले आहे, अशा विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर थांबण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाऊ नये यासाठी शिक्षण मंडळाकडून पुढील दोन महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांच्या आवेदानासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

Talegaon Dabhade : तळेगाव-चाकण रस्ता एमआयडीसी मार्गे होण्याचा अडथळा दूर; रामदास काकडे यांची माहिती

माध्यमिक शाळांमार्फत दाखल होणारे पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले परंतु परीक्षा न दिलेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 17 जून ते 21 जून या कालावधीत आवेदनपत्रे भरता येणार आहेत. या विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह 22 जून ते 25 जून या कालावधीत आवेदनपत्रे भरता येतील.

माध्यमिक शाळांना 8 जून ते 26 जून या कालावधीत बँकेत चलनाद्वारे शुल्क भरता येईल. माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरण्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या 27 जून पर्यंत जमा कराव्यात, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत.

आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरता ( SSC Exam) येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.