Maharashtra : दहावीच्या परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरण्याची तारीख जाहीर

एमपीसी न्यूज – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा मार्च 2024 मध्ये होणार (Maharashtra) आहेत. संभाव्य तारखांचे वेळापत्रक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. आता ऑनलाईन माध्यमातून आवेदनपत्रे भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत ही आवेदनपत्रे शाळांमार्फत भरता येणार (Maharashtra)आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर क्रेडीट घेणारे विद्यार्थी)चे विषय घेऊन प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे भरणे आवश्यक आहे.

आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर संधी निर्माण करा – के. एन. चौधरी

www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर नियमित शुल्क भरून ही आवेदनपत्रे भरता येणार आहेत. माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क आरटीजीएस द्वारे भरणा करावा. आरटीजीएस/एनईएफटी पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलीस्ट जमा करण्याची तारीख नंतर कळवली जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.