Drainage Work: अमृत योजनेअंतर्गत सेक्टर 22 मध्ये ड्रेनेज लाईनची कामे चालू करा – सचिन चिखले

एमपीसी न्यूज : अमृत योजनेअंतर्गत सेक्टर 22 मध्ये ड्रेनेज लाईनचे कामे (Drainage Work) चालू करण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत ड्रेनेज विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. त्यात चिखले यांनी म्हटले आहे की, मागील काही वर्षे यमुनानगर भागामध्ये अमृत योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात लाईन टाकण्याचे काम चालू करण्यात आले. प्रत्येक मुख्य लाईन ही बदलण्यात आली.(Draiage Work) त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर 22 या ठिकाणी मुख्य रस्त्यावरील लाईनचे काम होणे गरजेचे आहे. अमृत योजनेअंतर्गत हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. या भागात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईन चोकोप असतात.

Shreemant Dagdusheth Halwai Ganpati : ‘दगडूशेठ’च्या श्री पंचकेदार मंदिर सजावटीचे उद्घाटन बुधवारी होणार

मुख्य लाईन अमृत योजनेअंतर्गत केल्यामुळे मोठ्या प्रमाणात अंतर्गत लाईन टाकण्यासाठी सोयीस्कर होईल. एकता चौक ते अंकुश चौक, संजय हॉटेल ते अंकुश चौक, पवळे शाळा ते शिवाजी चौक आणि गणेश हौ. सोसायटी मागिल बाजु व इतर सर्व ड्रेनेज पाईपलाईन हे अमृत योजनेअंतर्गत लवकरात लवकर करावे.(Drainage Work) याबाबत  गेले दोन वर्ष सतत पाठपुरावा करत आहे. वारंवार मागणी करत आहोत. तत्काळ काम हाती न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा चिखले यांनी निवेदनातून दिला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.