Panshet Dam Update : पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये 3 हजार 908 क्यूसेक विसर्ग सुरु

एमपीसी न्यूज : पानशेत धरणाच्या (Panshet Dam Update) सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा 2 हजार 931 क्यूसेक विसर्ग वाढवून संध्याकाळी 5 वाजता 3 हजार 908 क्यूसेक करण्यात येत आहे. असे यो.स.भंडलकर (सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प) यांनी सांगितले आहे.

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, याची नोंद घेण्यात यावी. पानशेत धरण हे आंबी नदीवर बांधण्यात आले आहे. आंबी नदी ही मुठा नदीची उपनदी आहे. या दोन्ही नद्यांच्या काठावर लोकांनी सतर्क रहावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.