Contract workers : सरकारी उद्योगातील कंत्राटी कामगारांची पिळवणूक थांबवा;भारतीय मजदूर संघाचा ठेकेदारांना इशारा

एमपीसी न्यूज – संरक्षण व सरकारी उद्योगातील कंत्राटी कामगारांची ठेकेदारांमार्फत पिळवणूक सुरु आहे.राजकीय पक्षांनीही ट्रेड युनियऩच्याद्वारे आपले दुकान चालवत आहेत, या गैरबाबी वेळीच थांबल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु, असा ईशारा भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उद्योग प्रभारी आण्णा धुमाळ यांनी त्यांच्या भाषणात दिला.

देहुरोड येथील आयुध निर्माण कंपनी येथे 29 जुलै रोजी “ठेकेदार कामगार संघ” (संलग्न भारतीय मजदूर संघ ) च्या संघटनेचे नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी धुमाळ बोलत होते.यावेळी भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे कार्याध्यक्ष उमेश विस्वाद,संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, राष्ट्रीय  मिडिया प्रभारी, निलेश खेडेकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.यावेळी रिबीन कापत फलकाचे अनावरण करण्यात आले.

 

आण्णा धुमाळ म्हणाले की,  देहूरोडमध्ये सध्या चालू असलेल्या ठेकेदारकडून जी पिळवणूक करत आहेत त्यांना इशारा दिला जर हे प्रकार थांबले नाहीत तर केंद्रीय पातळीवर हा विषय घेऊन वेळ पडली तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करु. राजकीय पक्ष जर ट्रेड युनियनच्या नावाने सुरू केलेले दुकान लवकर बंद करावे. कामगारांच्या हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न करावे त्यासाठी आम्ही त्यांना मदत करू पण जर राजकीय पक्ष म्हणून आपण कामगारांना त्रास देण्याचा प्रयत्न जर केला भारतीय मजदूर संघ सहन करणार नाही, असा इशाराही धुमाळ यांनी  दिला.

यावेळी अशोक थोरात यांनी सुत्रसंचालन केले तर  गणेश भेगडे यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.