Pimpri : रयत विद्यार्थी मंचच्या वतीने पिंपरीत विद्यार्थी दिन साजरा

एमपीसी न्यूज –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत घेतलेला प्रवेश दिन शहरात शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त रयत विद्यार्थी मंचच्या वतीने पिंपरीतील आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा व संविधान प्रस्ताविकेचे पूजन करण्यात आले. संतोष शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी बहुजन हिताय, बहुजन सुखाय वाचनालयाचे संचालक गिरीष वाघमारे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 साली साताऱ्यातील राजवाडा चौक येथील प्रतापसिंह विद्यालयाकत प्रवेश केला होता. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी केलेल्या त्यंच्या योगदानाची संपूर्ण जगाने दखल घेतली आहे. त्यामुळेच राज्य सरकार हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करत आहे, असे त्यांनी सांगितले. धम्मराज साळवे, अंजना गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

रयतचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, कार्याध्यक्षा अंजना गायकवाड, सचिव नीरज भालेराव, सहसचिव मेघा आठवले, सहसचिव भाग्यश्री आखाडे, शहराध्यक्ष रोहित कांबळे, सचिव समाधान गायकवाड, उपाध्यक्ष महेश गायकवाड, उपाध्यक्ष वैभव कांबळे, प्रतीक वाघमारे, योगेश कांबळे, रुहिनाज शेख आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.