Talegaon : सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत घोजगे

एमपीसी न्यूज – जांबवडे येथील भरत बबन घोजगे यांची सुदुंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. किरण श्रीधर गाडे यांनी सोसायटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी भरत घोजगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल सुर्यवंशी यांनी केली. यावेळी सचिव सुनील गाडे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

दरम्यान, जांबवडे येथे ग्रामस्थांच्या वतीने भरत घोजगे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशीद पाटील, संत तुकाराम सहकारी साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, सरपंच सारिका घोजगे, उपसरपंच अंकुश घोजगे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, माजी चेअरमन सोपान गाडे, संजय भांगरे, माजी व्हाईस चेअरमन, बाळासाहेब भांगरे, शामराव भोसले, दिलीप भोसले, सुदुंबरे गावचे माजी सरपंच माणिक गाडे, माजी उपसरपंच जालिंदर गाडे, सुनील देवकर, पोलीस पाटील जग्गनाथ नाटक, मधुकर शेळके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बापूसाहेब भेगडे, बाळासाहेब काशीद पाटील, माणिक गाडे, जालिंदर गाडे, सुनील देवकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सोपान भांगरे यांनी केले. माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नाटक यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.