Sudumbare News : आमदार शेळके यांच्या प्रयत्नातून सुदुंबरे येथे विकासकामांना प्रारंभ

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या सुदुंबरे येथील बंदिस्त गटर योजना कामाचे भूमिपूजन रविवारी (दि 21) आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी माजी आदर्श सरपंच माणिक गाडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाजीराव गाडे, माजी उपसरपंच जालिंदर गाडे, सुदुंबरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष गाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील गाडे, माजी उपसरपंच बापूसाहेब दरेकर, ताराचंद गाडे, विश्वनाथ आंबोले, गणेश गाडे, माणिक गाडे, संदीप गाडे, ग्रामपंचायत सदस्या कांताबाई गाडे, ग्रामपंचायत सदस्या उमा शेळके, सारिका सुर्वे, चांगुना गाडे, प्रल्हाद चव्हाण, सोमनाथ गुंजाळ, स्वप्निल बेल्हेकर, संजय कसबे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके यांनी विशेष प्रयत्नातून 2515 अंतर्गत फंडातून बंदिस्त गटर योजनेच्या कामासाठी निधी दिल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.