Lonavala : ज्येष्ठ नागरिकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – लोणावळ्यातील भुशी रामनगर येथील एका 65 वर्षीय व्यक्तीने त्याच्या राहत्या  घराच्या छापराला साडीच्या किनारीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (6 अॉगस्ट)  सायंकाळी सात वाजण्याच्या पूर्वी घडली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समजले नाही.

लक्ष्मण देवजी पालवे (वय -65, रा.  भुशी, रामनगर, लोणावळा) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पालवे यांनी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्याप समजले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या  पोलीस उपनिरीक्षक आर.बी.मुंडे या करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.