Suspense of Bigg Boss 14 : ‘बिग बॉस 14’ असणार उत्कंठावर्धक

'Bigg Boss 14' will be thrilling छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कलाकार निया शर्मा व विवियन डिसेना यांची नावं चर्चेत आहेत

एमपीसी न्यूज – सेलिब्रेटी ख-या आयुष्यात कसे असतात याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. ते जाणून घेण्यासाठी ‘बिग बॉस’ या शो ची निर्मिती झाली. अर्थात हा शो अनेक कारणांनी वादग्रस्त ठरतो. हे वाद टीआरपी वाढवण्यासाठी मु्द्दाम निर्माण केले जातात.

‘बिग बॉस’चा चौदावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात हा शो सुरु होणार असून यावेळी बिग बॉसच्या घरात कोणत्या सेलिब्रिटींची एण्ट्री होणार याची उत्सुकता आहे. यंदाच्या सीझनसाठी तीन सेलिब्रिटींची नावं सध्या चर्चेत आहेत.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कलाकार निया शर्मा व विवियन डिसेना यांची नावं चर्चेत आहेत. तर शेखर सुमन यांचा मुलगा व अभिनेता अध्ययन सुमन यालासुद्धा विचारण्यात आल्याचं समजतंय. ‘राज ३’ या चित्रपटात अध्ययन झळकला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अध्ययन व कंगना राणावत यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या.

यातील निया शर्मा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘नागिन- भाग्य का जहरीला खेल’ या मालिकेत तिने भूमिका साकारली होती. तर आशियातील सर्वांत सेक्सी महिलांच्या यादीत तिने दोन वेळा स्थान मिळवलं होतं. दुसरीकडे विवियनने ‘शक्ती – अस्तित्त्व के एहसास की’, ‘प्यार की ये एक कहानी’, ‘मधुबाला- एक इश्क एक जुनून’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

‘बिग बॉस 13’ च्या लोकप्रियतेनंतर चाहते पुढच्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.  यावर्षी शोमध्ये लॉकडाऊन कनेक्शन प्रेक्षकांना बघायला मिळू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पिंकविलाच्या  रिपोर्टनुसार, बिग बॉस या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोच्या पुढील सीझनमध्ये प्रेक्षकांना मोठा बदल पाहायला मिळणार आहे. देशाची सद्यस्थिती लक्षात घेता निर्मात्यांनी ‘बिग बॉस 14’ मध्ये लॉकडाऊनचा तडका लावण्याची योजना आखली आहे. या शोचे नाव ‘बिग बॉस 14 लॉकडाऊन एडिशन’ असणार असल्याचेही वृत्त आहे. मागील सीझनचा प्रीमियर 29 सप्टेंबर रोजी झाला होता, परंतु यावर्षी हा शो उशिरा येण्याची शक्यता आहे.

तसेच यावेळी सेलफोन नेण्याची परवानगी मिळणार असल्याची चर्चा आहे.  मागील सर्व सीझनमध्ये शोच्या स्पर्धकांना बाह्य जगाशी कोणताही संबंध ठेवण्याची परवानगी नव्हती. यंदाच्या पर्वात स्पर्धक फोन घेऊन घरात प्रवेश करू शकतात आणि चाहत्यांना त्यांचे ब्लॉग आणि व्हिडिओ पाठवू शकतात. परंतु या फॉर्मेटवर सध्या चर्चा सुरु आहे.

‘भाबीजी घर पर हैं’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेला या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी संपर्क साधण्यात आला होता, पण कामात व्यस्त असल्यामुळे तिने ही ऑफर नाकारली. तर दुसरीकडे अभिनेत्री चाहत खन्नालाही ऑफर देण्यात आली होती, पण तिनेही या कार्यक्रमात रस दाखवला नाही. चाहत म्हणाली की अशा शोमध्ये तिची रुची नाही.

रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला, पारस छाबडा, शहनाज गिल आणि माहिरा शर्मा या सेलिब्रिटींनी  बिग बॉस 13 हा शो गाजवला होता.  विजेता ठरलेल्या सिद्धार्थ शुक्लासह असीम रियाजनेही या कार्यक्रमातून बरीच प्रसिद्धी मिळवली होती. दोघांच्या भांडणाने शोला चांगला टीआरपी मिळाला होता. मागील सीझनमधील हाय व्होल्टेज ड्रामामुळे अनेक विक्रम मोडले गेले होते.

View this post on Instagram

सेलिब्रेटी ख-या आयुष्यात कसे असतात याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. ते जाणून घेण्यासाठी 'बिग बॉस' या शो ची निर्मिती झाली. अर्थात हा शो अनेक कारणांनी वादग्रस्त ठरतो. हे वाद टीआरपी वाढवण्यासाठी मु्द्दाम निर्माण केले जातात. ‘बिग बॉस’चा चौदावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात हा शो सुरु होणार असून यावेळी बिग बॉसच्या घरात कोणत्या सेलिब्रिटींची एण्ट्री होणार याची उत्सुकता आहे. यंदाच्या सीझनसाठी तीन सेलिब्रिटींची नावं सध्या चर्चेत आहेत. . @bigboss.14.official @niasharma90 @viviandsena . #bigboss #bigbossnews #bigboss14 #bigboss14updates #niasharma #viviandsena #celebrity #marathinews #mpcnews #i_support_mpcnews

A post shared by MPC News Pvt. Ltd. (@mpcnews.in) on

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.