Bigg Boss – 14: ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात ‘राधेमॉं’ अवतीर्ण होण्याची शक्यता

स्वत:ला देवीचा अवतार असल्याचे सांगणारी सुखविंदर कौर उर्फ राधे मां यंदाच्या पर्वात सहभागी होणार आहे. सुखविंदरला राधे मांच्या नावाने बरीच प्रसिद्धी मिळाली आहे.

एमपीसी न्यूज – ‘बिग बॉस’ या छोट्या पडद्यावरील रिअ‍ॅलिटी शोमधील खमंग गॉसिपची चर्चा करायला प्रेक्षकांना नेहमीच आवडते. त्यामुळे हा शो नेहमीच वादात सापडतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचे आजवर 13 सीझन झाले आहेत. तरीदेखील चौदाव्या सीझनमध्ये कोण कोण सहभागी होणार आहे आणि स्पर्धक काय धमाल उडवणार आहेत याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

यावेळाच्या भागात सहभागी होणा-या अनेक स्पर्धकांची नावे आता हळूहळू पुढे येत आहेत. यावेळी 14 सेलिब्रिटी आणि 3 कॉमनर्स बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. यंदाच्या पर्वात वादग्रस्त आयुष्य जगणारी राधे मां स्पर्धकाच्या रुपात या कार्यक्रमात दिसणार आहे. याबद्दल चॅनेल किंवा निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

स्वत:ला देवीचा अवतार असल्याचे सांगणारी सुखविंदर कौर उर्फ राधे मां यंदाच्या पर्वात सहभागी होणार आहे. सुखविंदरला राधे मांच्या नावाने बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. गेल्या अनेक सीझनसाठी तिच्याशी संपर्क साधला जात होता, पण यावर्षी तिने ही ऑफर स्वीकारली आहे. गुरदासपूर जिल्ह्यात जन्मलेली सुखविंदर कौर लहानपणीच भक्तीच्या मार्गावर निघाली.

विचित्र ड्रेसिंग सेन्स, बोलण्याची पद्धत आणि लोकांच्या अडचणी दूर करण्याचा दावा करणारी राधे मां अनेक कारणांमुळे वादात सापडली आहे. वादग्रस्त वक्तव्ये आणि लोकांना आय लव्ह यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट म्हणून सुखविंदर सोशल मीडियावर चर्चेत राहिली.

बिग बॉस 4 मध्ये दिसलेली डॉली बिंद्रा राधेमांची भक्त होती. मात्र 2015 मध्ये डॉली बिंद्राने राधे मां आणि तिच्या काही भक्तांवर लैंगिक छळाचा आरोप लावला होता. चंदीगडस्थित एका मोठ्या पोलिस अधिका-याने घरी नेऊन लैंगिक छळ केल्याचा आरोप डॉलीने त्यांच्यावर लावला होता. याप्रकरणी डॉलीने पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि तिच्याशी असलेले नाते तोडले होते.

राधे मां व्यतिरिक्त यंदाच्या पर्वात टीव्ही अभिनेत्री जस्मीन भसीन, निया शर्मा आणि नैना सिंह दिसणार आहेत. याशिवाय अनु मलिक आणि आमिर अली यांची नावेदेखील या समोर आली आहेत. शोच्या सेटची दुरुस्ती सुरु आहे, ती पूर्ण झाल्यावर 4 ऑक्टोबरला या कार्यक्रमाचा भव्य प्रीमियर असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.