Maval : मावळातील गड-किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी पोलीस सरसावले

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील गड-किल्ल्यांना पर्यटक, दुर्गप्रेमी नियमित भेट देतात. मात्र दिवसेंदिवस येथे कचऱ्याचे साम्राज्य वाढत आहे. (Maval) त्यासाठी ग्रामीण पोलीस पुढे सरसावले असून ग्रामीण पोलिसांकडून ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ बुधवारी कार्ला येथील श्री एकवीरा देवी गडावरून करण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांची तसेच बौद्धकालीन लेण्यांची स्वच्छता राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ ही मोहीम हाती घेतली आहे. आठवड्यातून एक दिवस गड-किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिली.

Talegaon Dabhade : संगीत नाटक क्षेत्राच्या पाठीशी शासनाने उभे राहावे – सुरेश साखवळकर

लोणावळा परिसरातील गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळांच्या स्वच्छता मोहिमेत पोलीस, विद्यार्थी, सामाजिक, स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते, वकील, पत्रकार सहभागी झाले आहेत.(Maval) या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात आठवड्यातून एक दिवस गड-किल्ले, पर्यटनस्थळांच्या परिसरात आठवड्यातून एक दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे, असे कार्तिक यांनी नमूद केले.

लोहगड, विसापूर, तिकोना, तुंग, राजमाची किल्ल्यासह कार्ला, भाजे लेणी, लोणावळा परिसरात पर्यटनस्थळे टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, राजमाची पॉईंट, भुशी धरण तसेच लोणावळा शहर परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. ऐतिहासिक स्थळांचा वारसा जपणे तसेच संवधर्नासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे कार्तिक यांनी सांगितले. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.