Diwali pahat : दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करणार : ज्योती कळमकर

एमपीसी न्यूज – राजकारणाच्या पलीकडे जाऊन दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रम (Diwali pahat) आयोजित करण्यात येणार असल्याचे माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सांगितले.

श्रीनाथ सोशल फाउंडेशन व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट “स्वरोत्सव 2022” सप्तसुरांचा अनोखा अविष्कार असणारा सुगम संगीतातील अप्रतिम कार्यक्रम भाजपा जनसंपर्क कार्यालय समोर गणराज चौक बाणेर येथे संपन्न झाला. परिसरातील रसिक श्रोत्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. टाळ्यांच्या आवाजात कार्यक्रमातील प्रत्येक सुराला प्रेक्षकांनी दाद दिली.

यावेळी बोलताना माजी नगरसेविका ज्योती कळमकर म्हणाल्या की, परिसरातील नागरिकांची दिवाळी संगीता ने तृप्त व्हावी या येतूने हा सुरेख कार्यक्रम आयोजित केला होता. राजकारणाच्या पलीकडे जाऊन दर वर्षी अशा सुरेख कार्यक्रमाची संगीतमय मेजवानी परिसरातील नागरिकांसाठी देत राहू. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा त्यांनी या वेळी दिल्या.

PCMC News : गळतीच्या दुरुस्तीचे काम  युद्ध पातळीवर; उद्या सकाळपासून पाणीपुरवठा होणार

यावेळी बोलताना भाजप पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर म्हणाले की, दिवाळीच्या निमित्त साधून संगीतमय पहाट नागरिकांनी मोठया उत्साहात उपभोगली. सद्या होणाऱ्या ट्रॅफिक समस्यावर दिलगिरी व्यक्त करत  येणाऱ्या पुढील काळात मेट्रोच्या कामाची पूर्तता झाल्यानंतर ट्रॅफिक मधुन दिलासा मिळून नागरिकांना सामाजिक सेवेचा लाभ घेता येईल.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपा शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले की, सामाजिक सेवेतून आनंद कसा उपयोग करायचा हे गणेश कळमकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातून पहायला मिळते. त्यांच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मनाला एक वेगळी समाधान प्राप्त होते.

यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर यांनी देखील  ज्योती कळमकर आणि गणेश कळमकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कोथरूड विधानसभा अध्यक्ष पूनित जोशी, माजी नगरसेविका सप्नाली सायकर, राहूल कोकाटे, प्रल्हाद सायकर, सचिन दळवी, प्रवीण शिंदे, आणि प्रेक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.