PCMC News : गळतीच्या दुरुस्तीचे काम  युद्ध पातळीवर; उद्या सकाळपासून पाणीपुरवठा होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या जलवाहिनीला काल (दि. 26 ऑक्टोबर) रावेत येथे अचानक गळती सुरु झाली होती.(PCMC News) या गळतीच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु असून आज (दि. 27 ऑक्टोबर) सायंकाळी उशिरापर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर उद्या (दि. 28 ऑक्टोबर)  सकाळपासून शहरात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र या दुरुस्ती कामासाठी घेतलेल्या शटडाऊनमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले आहे.

महापालिकेच्या वतीने रावेत येथून अशुद्ध जलउपसा केंद्राद्वारे पाण्याचा उपसा करून निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. याठिकाणी  पाणी शुद्धीकरण करून  शहरातील विविध भागांत नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.  परंतु, 26 ऑक्टोबर रोजी रावेत येथे टप्पा 3 ला पाणीपुरवठा करणा-या 1400 मिलिमिटर व्यासाच्या जलवाहिनीला अचानक गळती सुरु झाली.

Fort making : कार्ल्यातील किल्ले बनवण्याच्या स्पर्धेत विठ्ठल रूखमिणी तरूण मंडळाचा प्रथम क्रमांक

महापालिकेच्या वतीने तातडीने या गळतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे अचानक शटडाऊन घ्यावा लागला. या कालावधीत शहरातील  पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पाणीपुरवठा  विभागाचे पथक अधिक मनुष्यबळाचा वापर करून गळती दुरुस्तीचे अविरत काम करीत आहे. युद्धपातळीवर सुरु असलेले हे काम आज रात्री उशिरापर्यंत पूर्ण होईल.(PCMC News) त्यानंतर  शहरातील पाणीपुरवठा सुरु होणार असून शटडाऊनमुळे उद्या सकाळपासून  होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. पूर्ववत स्थितीनंतर नियमितपणे योग्य दाबाने पाणी वितरण केले जाणार आहे, असे महापालिकेच्या वतीने सहशहर अभियंता सवणे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.