Ravet News : सायकलस्वाराच्या अपघाती मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करा; ‘इंडो’ अथलेटिक्सची मागणी

एमपीसी न्यूज – कात्रज – देहूरोड बायपासवर पुनावळे येथे सायकलस्वार प्रशांत कुमार यांच्या अपघाती मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाईची मागणी इंडो अथलेटिक्स सोसायटी, शहरातील इतर संघटनांची सदस्यांनी पोलिसांकडे केली.

याबाबत रावेतचे पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांना निवेदन दिले आहे.त्यात म्हटले आहे की, कात्रज-देहूरोड बायपासवर पुनावळे येथे सायकलस्वार प्रशांत कुमार यांचा अपघाती मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.त्याचा वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहन दोन्ही जप्त करावे.जेणेकरून भविष्यामध्ये त्याच्याकडून असे कृत्य घडू नये.

याप्रसंगी स्वर्गीय प्रशांत कुमार यांना आदरांजली वाहण्यात आली.सायकलिस्ट व धावपटू यांच्या सुरक्षिततेसाठी शपथ घेण्यात आली.त्याचे सायकलप्रेमींनी 30 ऑगस्ट रोजी सकाळी10 वाजता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे जमावे, असे आवाहन करण्यात आले.इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे लवकरच एक रस्ता सुरक्षा संदर्भात सामाजिक जागर पोलीस दलासोबत घेण्यात येईल, असे आयएएसचे सदस्य गजानन खैरे यांनी सांगितले.

यावेळी गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील, गिरीश परदेशी, गिरीराज उमरीकर, अजित गोरे, असीम दरेकर, निलेश घोळवे, डॉ.अजय शर्मा, संदीप परदेशी, अमीर शेख, सुनील चाको, युवराज पाटील त्याचप्रमाणे इतर सदस्य देखील उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.