Talwade:तळवडे येथे दुकानाला आग

एमपीसी न्यूज – तळवडे येथे दुकानाला आग लागली. ही घटना आज (बुधवारी) दुपारी तीनच्या सुमारास मोशी-देहूरोड रोडवर घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोशी-देहूरोड रस्त्यावर तळवडे येथे आज दुपारी एका दुकानाला अचानक आग लागली. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानुसार तळवडे आणि चिखली अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.