Pune : गंगाधाम येथील आगीवर 8 तासानंतर नियंत्रण मिळविण्यात यश

अग्निशमन दलाकडून १४ फायरगाड्या व ०६ वॉटर टँकर

एमपीसी न्यूज – अग्निशमन दल नियंत्रण कक्षात आईमाता मंदिराजवळ गोडाऊनला आग लागल्याची वर्दी मिळताच आज दिनांक  18  रोजी सकाळी 8 •55  वाजता (Pune ) गंगाधाम व कोंढवा अग्निशमन केंद्र येथून वाहन रवाना करण्यात आले. बरेच साहित्य जळून खाक झाले. आग नियंत्रण मिळविण्यावर 8 तासात अग्निशमन दलाला सायंकाळी यश आले.

 

घटनास्थळी पोहोचत असताना खुप दुरवरुन मोठ्या प्रमाणात धुर दिसत असल्याने जवानांनी आगीचे भीषण स्वरुप पाहता अग्निशमन वाहनांची अतिरिक्त मदत मागविली. अग्निशमन दलाकडून १४ फायरगाड्या व ०६ वॉटर टँकर तसेच पीएमआरडीए अग्निशमन दलाची ०२ वाहने घटनास्थळी दाखल झाली होती.

 

महापालिका पाणीपुरवठा विभाग यांचेकडून ही १० च्या वर वॉटर टँकर पाठविण्यात आले होते. सदर ठिकाणी अंदाजे २० ते २५ विविध साहित्य जसे की, सिमेंट, मांडव साहित्य, कपडे, साबण, ऑईल पेंट, काच, रबर, वायरिंग व इतर अनेक प्रकारचे साहित्य होते. चोहोबाजूंनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करुन शेजारीच असलेल्या वस्तीत आग पसरु नये याची जवानांनी काळजी घेतल्याने मोठा धोका टळला.

याठिकाणी किमान १०० च्यावर गोडाऊन असून इतर उर्वरित गोडाऊन व शेजारीच ट्रॉन्सपोर्टचे असलेले किमान २५ ट्रक वाचविण्थात अग्निशमन दलाला यश आले आहे. सकाळी हवा मोठ्या प्रमाणात व वारयाचा वेग जोरात असल्याने आग झपाट्याने पसरली.

 

अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे तसेच जवळपास १५ अधिकारी व १०० जवान आग विझवण्याचे काम करीत आहेत. महापालिकेचे मुख्य अभियंता कंदुल साहेब व क्षेत्रीय अधिकारी व सर्व कर्मचारी, JCB वाहने या सह घटनास्थळी सुरवातीपासूनच सर्वोतपरी मदत कार्यात सक्रियपणे सहकार्य करीत आहेत.

 

श्री. पावसकर यांनी देखील मुबलक पाणी उपलब्ध होईल या साठी स्वतः लक्ष ठेवून वॉटर टँकरची व्यवस्था केली. सध्या आग नियंत्रणात असून कुलिंग करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने अद्याप या घटनेत कोणी जखमी अथवा जिवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.