Pune : पुण्यात पती-पत्नी सापडले मृतावस्थेत

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune) शुक्रवार पेठेत एका फ्लॅटमध्ये दाम्पत्य मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.हेमंत रामकृष्ण थोरात (वय ६४) आणि त्यांची पत्नी सुनीता (वय ५८, दोघे रा. सेवा मित्र मंडळाजवळ, चिंचेची तालीम, शुक्रवार पेठ) अशी मृतावस्थेत सापडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

Pune : गंगाधाम येथील आगीवर 8 तासानंतर नियंत्रण मिळविण्यात यश

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,  थोरात दाम्पत्याचा घराचा दरवाजा सकाळी बंद होता. दरवाजा उघडा नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला.

शेजाऱ्यांनी दरवाजा वाजविला. मात्र, थोरात यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर या घटनेची माहिती खडक पोलिसांना कळविण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा सुनीता काॅटवर बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळून आले. हेमंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

सुनीता आणि हेमंत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

सुनीता गेल्या तीन ते चार वर्षांपासून आजारी होत्या. सुनीता यांच्या मृत्युमागचे कारण समजू शकले नाही. खडक पोलिसांकडून थोरात यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात येत आहे.

शवविच्छेदन अहवालात सुनीता यांच्या मृत्युमागचे कारण समजेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.