Alandi : माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान उत्साहात

एमपीसी न्यूज : माऊलींचा पालखी  सोहळा दि.18 रोजी सकाळी वाल्हे येथून लोणंदकडे मार्गस्थ झाला. सकाळचा विसावा पिंपरे खुर्द विहीर झाला तर दुपारचा विसावा नीरा येथे झाला. तसेच माऊलीं माऊलींच्या जयघोषात नीरा स्नानासाठी माऊलींच्या पादुका निरेत नेण्यात आल्या.

 

Pune : पुण्यात पती-पत्नी सापडले मृतावस्थेत

 

हा सोहळा पाहण्यासाठी नदी घाटावर अनेक वारकरी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच वारकरी भाविकांनी सुद्धा नीरा स्नान केले . नीरा स्नानानंतर पालखी लोणंदकडे मार्गस्थ झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.