Pune : मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा करू देणार नाही म्हणणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : आषाढी एकादशीदिवशी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पांडुरंगाची महापूजा करू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक संतोष शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

Pune : मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा करू देणार नाही म्हणणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थानादिवशी पोलीस व वारकऱ्यांमध्ये झालेला गोंधळावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपकरून महाराष्ट्रात धर्मांध वातावरण सुरू असून, वारकऱ्यांवर झालेला हल्ला सरकारपुरस्कृत असल्याचाही आरोप केला होता. फेसबुकवर लाईव्ह येऊन हे आरोप करत त्यांना महापुजा करू देणार नाही, असा इशारा दिला होता.

 

याप्रकरणी पुणे (Pune) पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात संतोष शिंदे यांच्यावर भादवी कलम १५३, १८९, ५०५ (१), (ब), ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत तुषार दामगुडे (वय ४२) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थानादिवशी मंदिरात गोंधळ झाला. पोलिसांनी लाठी चार्ज केल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला. तर पोलिसांनी लाठीचार्ज झाला नसल्याचा खुलासा केला. या गोंधळानंतर राज्यातील राजकारण देखील तापले होते. इतिहासात प्रथमच अशी घटना घडल्याचेही दिसून आले. सरकारवर या गोंधळावरून आरोप करण्यात आले.

 

यादरम्यान, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक संतोष शिंदे यांनी त्यांच्या फेसबुकवरून लाईव्ह करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि सरकारवर आरोप केले. सरकार पुरस्कृत लाठीचार्ज असून, सध्या महाराष्ट्राचे वातावरण धर्मांध आहे. संभाजी ब्रिगडेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना इशारा देत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

 

तसेच, माफी न मागितल्यास आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची महापुजा करू देणार नाही, असा इशाराही केला होता. वारकऱ्यांच्या मनात पोलीस व प्रशासनाविरूद्ध द्वेष निर्माण केला. तसेच, चितावणीखोर वक्तव्यकरून भितीदायक वातावरण तयार केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास (Pune) पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.