Nigdi : ओटास्कीम येथे वाहने पेटवली

एमपीसी न्यूज – निगडी मधील ओटास्कीम येथे अज्ञातांनी वाहने पेटवून त्यांचे नुकसान केले. ही घटना रविवारी (दि. 16) पहाटेच्या सुमारास घडली.

Nigdi : फ्रीज दुरुस्तीच्या कामासाठी गेला अन काळाने घाला घातला

 

मिळालेल्या माहितीनुसार, ओटाकीम येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली वाहने अज्ञातांनी रविवारी पहाटेच्या सुमारास पेटवली.

यामध्ये वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.

यामध्ये तीन रिक्षा, एक सुमो आणि एक मिक्सरचा समावेश आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.