Nigdi : ओटास्कीम येथे रिक्षा जळून खाक

एमपीसी न्यूज – ओटास्कीम निगडी येथे एका रिक्षाला आग लागली. यामध्ये रिक्षा (Nigdi)  जळून खाक झाली. रिक्षाला लागलेली आग शेजारी पार्क केलेल्या इतर दोन रिक्षाला देखील लागली. ही घटना गुरुवारी (दि. 28) रात्री घडली.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम निगडी येथील पीसीएमसी कॉलनी मध्ये गुरुवारी रात्री एका रिक्षाला (एमएच 12/एनडब्ल्यू 2182) आग लागली. या आगीमध्ये रिक्षा पूर्णपणे जळाली. दरम्यान ही आग इतर दोन रिक्षांना (एमएच 14/एचएम 0200), (एमएच 12/क्यूई 9729) लागली यामध्ये दोन रिक्षांचे बॉडी कव्हर जळाले.

Entelki Jeevan Disha : एंटेल्कीच्या ‘जीवन दिशा’ मधून जाणून घ्या आपल्या पाल्याचा शैक्षणिक कल अन घडवा उज्वल भविष्य

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमन संपत गौड, वाहन चालक अमोल रांजणे, फायरमन अनिल माने, विशाल पोटे, ट्रेनी सब ऑफिसर शुभम पिंपळे, ट्रेनी फायरमन निरंजन, लोखंडे तेजस पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पेटलेल्या रिक्षांवर पाणी मारून आग पूर्णपणे विझवली गेली.

वेळीच आग विझवल्याने मोठे नुकसान टळले. आग लागलेल्या रिक्षाच्या शेजारी इतर दहा ते पंधरा रिक्षा आणि इतर वाहने होती. जवळच ट्रेनिंग फायरमन सुशील चव्हाण हे राहत असल्याने त्यांनी सतर्कता दाखवत इतर रिक्षांचे आणि वाहनांचे नुकसान होण्यापासून (Nigdi)  टाळले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.