Talegaon : भानू खळदेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – किशोर आवारे हत्या प्रकरणातील संशयित मास्टरमाईंड भानू खळदे पोलिसांच्या जाळ्यात (Talegaon) अडकला आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

चंद्रभान विश्वनाथ खळदे (वय 63, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) हा किशोर आवारे यांची हत्या झाल्यानंतर मावळमधून पसार झाला. खंडाळा, दौंड तालुक्यातील यवत, हैद्राबाद मार्गे नाशिक येथे पळून गेलेल्या खळदे याला नाशिक मधील सिंधी कॉलनी मधून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले. तो पोलिसांना 57 दिवस गुंगारा देत होता.

Pune : नवले पुलावर कोळशाने भरलेला ट्रक डिव्हायडर तोडून उलटला

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची 12 मे रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हत्या झाली. यामध्ये पोलिसांनी भानू खळदे याच्या मुलासह सात जणांना अटक केली. दरम्यान भानू खळदे पळून गेला होता.

खळदे याला शनिवारी (दि. 8) अटक केल्यानंतर रविवारी (दि. 9) त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने भानू खळदे याला 13 जुलै पर्यंत पोलीस कोठडी (Talegaon) सुनावली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.