Pune : नवले पुलावर कोळशाने भरलेला ट्रक डिव्हायडर तोडून उलटला; वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा

एमपीसी न्यूज – नवले पुलावरील अपघातांची मालिका कायम असून, आज (सोमवारी) सकाळी नवले पुलावरील तीव्र उतारावर मुंबईच्या दिशेने जाणारा 22 चाकी कोळशाने भरलेला (Pune) ट्रक ब्रेक फेल होऊन ,डिव्हायडर तोडून उलटला आहे. दुभाजक तोडून कंटेनर रस्त्याच्या विरूद्ध दिशेला जवळपास 100 मीटरपर्यंत फरपटत गेला.

Talegaon : प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाचे “एक शिक्षक एक झाड” या उपक्रमाअंतर्गत ” वृक्षारोपण

या ट्रक मध्ये  40 टन दगडी कोळसा होता .तो पुर्ण रस्त्यावर सांडला आहे. हायवे प्रशासन पोलीस प्रशासन अग्निशामक दल यांनी युद्धपातळीवरती काम सुरू केले आहे. मात्र या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या चार किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी सिंहगड वाहतूक विभागाचे पोलिस दाखल झाले असून पोलिसांकडून वाहतूक सुरळित करणाचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच रोडवरील कोळसा बाजूला करण्याचे काम सुरु केले आहे.

हे अपघात टाळण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने प्रायोगिक तत्त्वार अवजड वाहनांची वेगमर्यादा  कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत 40 किमी  ठेवण्यात आली होती. मात्र याचा कालावधी संपताच पुन्हा (Pune) अपघातांची मालिका सुरु झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.