Talegaon : प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाचे “एक शिक्षक एक झाड” या उपक्रमाअंतर्गत ” वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये (Talegaon) दरवर्षी प्रमाणे यावर्षीही डॉ वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रम कमिटी अंतर्गत प्रा.अर्चना गांगड व प्रा रघुनाथ ताम्हाणे यांच्या पुढाकाराने घोरवडेश्वर येथे ‘एक शिक्षक एक झाड’ हा सामाजिक उपक्रम राबविला .

Maval : वर्सोली धरणात तिघे बुडाले; दोघांचा मृत्यू

या उपक्रमा मध्ये शिक्षकांनी स्वतः खड्डे खणून विविध प्रकारची जवळपास 100 एक झाडे लावली. वृक्षारोपणाबरोबर शिक्षकांनी डोंगरावरील प्लास्टिक व काचेच्या बाटल्या गोळा करून आणखीन एका सामाजिक कार्यात भर घातली.

या उपक्रमात कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.वनिता कुऱ्हाडे व कला , वाणिज्य ,विज्ञान शाखेच्या समन्वयिका तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
संस्थेचे सचिव डॉ.दिपकजी शहा यांच्या प्रेरणेने व सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम अतिशय उत्साहात पार (Talegaon) पडला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.