Maval : वर्सोली धरणात तिघे बुडाले; दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – लोणावळा येथील वर्सोली धरणात वर्षाविहारासाठी आलेले तीन पर्यटक तरुण ( Maval ) बुडाले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून एकाला सुखरूपपणे पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. ही घटना रविवारी (दि. 9) घडली.

Pune : रेल्वे प्रवाशांना आता मिळणार मोफत पिशव्या

मुंबई येथील सहा पर्यटक तरुण लोणावळा जवळील वर्सोली येथे वर्षाविहारासाठी आले होते. रविवारी दुपारी धरणाच्या परिसरात ते पावसाचा आनंद घेत असताना तिघेजण धरणात बुडाले. सहकारी मित्रांनी तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते फक्त एका तरुणाला सुखरूपपणे बाहेर काढू शकले. अन्य दोघांचा धरणात बुडून मृत्यू ( Maval ) झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.