Talegaon : जंगली रमीमध्ये पैसे हरल्याने कॅब चालकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – जंगली रमी खेळात पैसे हरल्याने आलेल्या (Talegaon ) नैराश्यातून एका कॅब चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 9) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

गणेश सोमनाथ काळदंते (वय 32, रा. तेली आळी, तळेगाव दाभाडे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश यांना त्यांच्या भावाने कार घेऊन दिली होती. ती कार ते भाड्याने चालवत असत. मात्र त्यांना कॅब सर्विस मधून चांगले उत्पन्न मिळत नव्हते. पैशांची चणचण भासत असल्याने त्यांनी मोबाईलवर जंगली रमी हा खेळ खेळला. त्यामध्ये ते काही रक्कम हरले.

Talegaon : भानू खळदेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

व्यवसायात मिळणारे कमी उत्पन्न आणि त्यात रमी खेळात देखील पैसे हरल्याने आलेल्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी रविवारी रात्री राहत्या घरी गळफास घेतला. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घरच्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी गणेश यांना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

गणेश यांना दोन मुले आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत (Talegaon ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.