Talegaon Crime News : भरदिवसा किराणा दुकानातून तेलाचे डबे, तेलाचे बॉक्स चोरीला

एमपीसी न्यूज – भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी तळेगाव दाभाडे येथील एका किराणा दुकानातून तेलाचे डबे आणि तेलाचे बॉक्स चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 16) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कॉलेज शेजारी असलेल्या श्री स्वामी समर्थ प्रोविजन स्टोअर या किराणा दुकानात घडली.

संजय अमरचंद मुनोत (वय 56, रा. तळेगाव स्टेशन) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कॉलेज शेजारी श्री स्वामी समर्थ प्रोविजन स्टोअर नावाचे किराणा दुकान आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या दुकानातून चार हजार 600 रुपये किमतीचे 15 लिटरचे जेमिनी कंपनीचे सोयाबीन तेलाचे दोन डबे तसेच 15 लिटरचे जमिनी कंपनीचे सोयाबीन तेलाचे तीन बॉक्स प्रत्येकी किंमत 2 हजार 100 रुपये असा एकूण 10 हजार 900 रुपयांचा माल चोरून नेला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.