Pune News : ‘काँग्रेस’च्या छत्री दुरूस्ती उपक्रमात ‘भाजप’ची छत्री दुरूस्तीला

एमपीसी न्यूज – शीषर्क वाचून तुम्ही चकित झाला असाल, हा नेमका काय प्रकार आहे. तर, पावसाळा सुरू झाल्याने पुण्यात, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोफत छत्री दुरूस्ती उपक्रम सुरु केला आहे. या उप्रकात आज (शुक्रवारी) सकाळी चक्क भाजप नगरसेवकाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेली छत्री दुरुस्तीला आली होती.

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी व शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी हा मोफत छत्री दुरूस्ती उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात जुनी, नादुरूस्त छत्री मोफत दुरूस्त करून दिली जात आहे. पावसाळा सुरू झाल्याने नादुरूस्त छत्री दुरूस्त करून घ्यायला नागरिक गर्दी करत आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी भाजप नगरसेविका अ‍ॅड. गायत्री रत्नदीप खडके यांचे नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेली छत्री काँग्रेसच्या या उपक्रामात दुरूस्तीला आली होती. तसेच, एका नागरिकाने भाजप खासदार गिरीश बापट यांचे नाव असलेली छत्री दुरूस्तीला आणून दिली.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या उप्रकामची खिल्ली उडवत, ‘सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छता खाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जहीरातबाजी करतोय पाहा…या होर्डिंगच्या किंमतीत 50 नव्या छत्र्या आल्या असत्या’ अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.

तर, अतुल भातखळकर यांच्या टिकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिउत्तर दिले. नाना पटोले म्हणाले, छत्री दुरूस्ती उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. खिल्ली उडवणारे विशेष महाभागासाठी आजचा विशेष फोटो. भाजपची छत्री दुरूस्तीला काँग्रेस भवनाला आली आहे. असे ट्वीट् नाना पटोले यांनी केलं आहे.

दरम्यान, या अजब योगायोगाला अनेकांना कॅमेरा बंद केले. तसेच यावर अनेक हास्यविनोद रंगले. सोशल मीडियावर अनेकांनी हा फोटो शेअर करत ‘पुण्यात असचं असतं’ असं कॅप्शन दिलं. तर, अनेकांनी टीका टिप्पणी देखील केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.