Talegaon Dabhade: तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी प्रदीप लोंढे

Talegaon Dabhade: Appointment of Pradip Londhe as Senior Inspector of Police, Talegaon MIDC Police Station

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी प्रदीप लोंढे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी त्यांचा कार्यभार स्वीकारला आहे.

रंगनाथ उंडे यांची बदली सांगवी (पुणे) पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी झाली. त्या रिक्तपदी पिंपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांची नियुक्ती झाली.

त्यांनी पिंपरी वाहतुक व्यवस्था बदल करून वाहतूक कोंडी टाळून वाहतूक व्यवस्था नियमित करण्यात त्यांचा हातखंडा आहे. गुन्हेगारांवर त्यांची वचक असून ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.  अशी त्यांची ओळख आहे.

तळेगाव एमआयडीसी हद्दीत खुनाच्या अधिक घटना घडल्या असून एमआयडीसीतील वाहतूक व गुन्हेगारी संपवण्यासाठी अग्रेसर राहणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले.

त्यांच्या नियुक्ती बद्दल पोलीस स्टेशन मधील अधिकारी साधना पाटील, राहुल कोळी, अनिल भोसले, नंदकुमार चव्हाण, प्रशांत भोसले, सचिन काचोळे आदींनी त्यांचे स्वागत केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.