Pimpri: ओपन जीम, स्केटिंग ग्राउंड, लॉन टेनिस कोर्ट वापरास बंदी

No use of open gym, skating ground, lawn tennis court

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड शहरातील ओपन जीम, स्केटिंग, ग्राउंड, लॉन टेनिस कोर्ट वापरण्यास महापालिकेने परवानगी दिली होती. मात्र, त्या ठिकाणी सोशल डिन्स्टन्सिंगचे पालन केले जात नव्हते. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पालिकेच्या क्रीडा विभागाने ती संबंधित ठिकाणे बंद करण्याचा निर्णय बुधवारी (दि.17) घेतला आहे, असे सहाय्यक आयुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

महापालिकेच्या उद्यान,मैदान तसेच पदपथाच्या कडेला ओपन जीम आहेत. तेथे मोठ्या संख्येने नागरिक व्यायाम करतात. त्यामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे.

तसेच स्केटिंग ग्राउंड, लॉन टेनिस कोर्ट आदी ठिकाणी सामूहिकपणे इतर खेळ खेळले जात आहेत.सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाहीत.त्यामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. तर, काही ठिकाणी कर्मचा-यांना अरेरावी केली जात आहे.

त्यामुळे ही ठिकाणे नागरिक, खेळाडू, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींसाठी बंद करण्यात आली आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी जनजागृतीपर फलेक्स लावले जाणार आहेत.

तरीही नागरिकांनी गर्दी करुन त्याचा वापर केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा खोत यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.