Talegaon Dabhade : मावळ तालुका भाजप किसान आघाडी उपाध्यक्षपदी बाळासाहेब कराळे पाटील

एमपीसी न्यूज- सुदवडी येथील भाजपचे नेते बाळासाहेब निवृत्ती कराळे पाटील यांची मावळ तालुका भाजपच्या किसान आघाडी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

मावळ तालुका भाजपा किसान आघाडी अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी कराळे यांची निवड जाहीर केली असून कामगार व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ भाजपा अध्यक्ष प्रशांत ढोरे, युवामोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, जगन शेवकर यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

कराळे हे सुदवडी गावचे माजी उपसरपंच असून शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांना परिचित आहेत. तसेच त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. याप्रसंगी माजी सरपंच दशरथ अप्पा गाडे, सूर्यकांत मोईकर, गजानन कराळे पाटील, संजय मोईकर, सदानंद टिळेकर, संजय गाडे, बाळासाहेब शेंडे, रामदास गाडे, संतोष तांबे आदी उपस्थित होते. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कराळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.