Pune : वडगाव शेरीतून भाजपकडून उषा बाजपेयी इच्छुक

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. वडगाव शेरी मधून उषा बाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षाकडून अर्ज भरला आहे. बाजपेयी या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत सहभागी असून, कारिगर राष्ट्रीय भाजपा महिला मोर्चाच्या संयोजिका आहेत.

‘या निवडणुकीत मोदी सरकार कोणत्या निकषांवर उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी निकषात कौटुंबिक वारसा न घेता इतरांना संधी देण्याचा भाजपा सरकारने निर्णय घेतला आहे. महिला आरक्षण तसेच महिला सबलीकरण, महिला उद्योजिकीकरण कार्यातील माझा सातत्याने सहभाग या निकषांवर पक्ष नक्कीच लक्ष देईल. मी २०१२ मध्ये देखील निवडणूक लढवली आहे. यंदा लोकसहभाग आणि मागणी नुसार मी अर्ज भरला आहे, अशी माहिती उषा बाजपेयी यांनी दिली.

उषा वाजपेयी या शिक्षण व माध्यम संशोधन केंद्र (ईएमआरसी) पुणे विद्यापीठ येथे माध्यम संशोधक होत्या. बाजपेयी राष्ट्रीय महिला मोर्चा, भाजपाच्या राष्ट्रीय संयोजिका पदावर कार्यरत आहेत. वडगांव शेरी भागातून भाजपा उमेदवारीसाठी उषा बाजपेयी, जगदीश मुळीक, राजेश लोकरे, महेंद्र गलांडे, संजय पवार इच्छुक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.