Talegaon Dabhade : सोमनाथ वारींगे यांचे निधन

एमपीसी न्यूज- वारंगवाडी मावळ येथील श्री सुदर्शन तरूण मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सोमनाथ गोपाळ वारींगे (वय 50) यांचे आज, बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय वारींगे यांचे बंधू तर युवा कार्यकर्ते अक्षय वारींगे यांचे ते वडील होत. कुशल इलेक्ट्रिशियन आणि मोटार रिवायंडर म्हणून सोमनाथ वारींगे यांची पंचक्रोशीमध्ये ओळख होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.