Talegaon-Dabhade : हृदयविकार टाळण्यासाठी नियमित व्यायाम व योग्य आहार आवश्यक – डॉ. झंवर

एमपीसी न्युज : ‘आपल्याला आरोग्यसंपन्न राहण्यासाठी नियमित व्यायाम व योग्य आहार हा अत्यंत आवश्यक आहे. (Talegaon-Dabhade) सध्या तरुण वर्गामधे जंक फूडचे प्रमाण वाढत चालले आहे आणि ते शरीराला हानीकारक आहे त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आहाराबद्दल आणि व्यायामाबदल जागरूक असणे गरजेचे आहे’ असे मत प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ईश्वर झंवर यांनी व्यक्त केले.

इंद्रायणी वरिष्ठ महाविद्यालचा विज्ञान विभाग व इनरव्हिल क्लब, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिनानिमित्त प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ईश्वर झंवर यांचे समुपदेशनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विज्ञान विभागप्रमुख प्रा. रोहित नागलगाव, (Talegaon-Dabhade) वरिष्ठ प्रा. डॉ. विजयकुमार खंदारे, लायन्स क्लबचे डॉ. शाळिग्राम भंडारी तसेच अनेक विभागांचे विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. झंवर यांनी हृदयविकार कसे टाळता येतील यासंदर्भात स्लाईड शोच्या माध्यमातून उपस्थितांना माहिती दिली. यावेळी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे व शंकांचे योग्य निरसन डॉ.झंवर यांनी केले.

Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार साधणार शहरातील सोसायटीधारकांशी संवाद

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा के व्हि अडसूळ यांनी जागतिक हृदय दिनाचे (Talegaon-Dabhade) महत्त्व सांगितले.आपले हृदय कार्यक्षम असणे म्हणजे आपण आरोग्यसंपन्न असणे असे सरळ समीकरण असल्याचे निदर्शनास आणून देत प्रा. अडसूळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी हार्ट अटॅक येण्याची संशयास्पद चिन्हे आढळल्यास वापरायची 200 इमरजनसी मेडिकल किट सर्व प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी यांना इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या तर्फे वाटप करण्यात आली.

कार्यक्रमाचे स्वागत इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा वैशालीताई दाभाडे यांनी केले तर  प्रास्ताविक डॉ. दीपाली भंडारी यांनी केले. विज्ञान विभागप्रमुख प्रा. रोहित नागलगाव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करवून दिला.सूत्रसंचालन सौ. ऐश्वर्या शेवकर यांनी केले व सौ. पुजा तल्लुर यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमास इंद्रायणी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी होते.प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सर्वाना मार्गदर्शन केले.(Talegaon-Dabhade) इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास काकडे, कार्यवाह श्री चंद्रकांत शेटे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.