Talegaon Dabhade News : भरधाव कंटेनरनेच्या धडकेने पादचारी ठार; दोन जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव कंटेनरने दोन दुचाकीला (Talegaon Dabhade News )पाठीमागून धडक देऊन पादचाऱ्याला चिरडले. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी तर पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि.2) रात्री 10:30 वाजता तळेगाव दाभाडे-चाकण राष्ट्रीय मार्गावर स्वराज नगरीजवळ ( तळेगाव दाभाडे ता. मावळ)  घडला. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला.

 जखमी सागर बबन बोऱ्हाडे वय 27 रा. ब्राम्हणवाडी (साते) ता. मावळ यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली.शिव बालन एस (वय 20, रा. तामिळनाडू ) मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.सागर बबन बोऱ्हाडे (वय 27), संतोष बोऱ्हाडे दोघे (रा. ब्राम्हणवाडी (साते) ता. मावळ) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत.

 

Today’s Horoscope 04 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार  , फिर्यादी सागर बोऱ्हाडे व संतोष बोऱ्हाडे हे  दोघे आपल्या दुचाकीवरून हे दूध डेअरी बंद करून वडगाव फाटा येथे निघाले होते.एम एच 48 बी एम 3560 क्रमांकाचा कंटेनरने पाठीमागून दोन्ही दुचाकीला चिरडून पादचाऱ्याला चिरडले. यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले तर पादचारी शिव बालन एस हा जागीच ठार झाला. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला.

घटनास्थळी पोलीस उप निरीक्षक संदेश इंगळे, पोलीस अंमलदार व नागरिकांनी धाव घेऊन जखमींना सोमाटणे फाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले.अपघात इतका भीषण होता की परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या ठिकाणी तीव्र उतार असल्याने वाहनांना गती असते. तळेगाव दाभाडे-वडगाव फाटा चौकात स्वयंचलित सिग्नल, गतिरोधक, हायमॅक्स दिवे, सूचना फलकाचा अभाव असल्याने या चौकात दैनंदिन अपघात होत आहेत.

 तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. फरार कंटेनर चालकाला अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना केले आहे.या (Talegaon Dabhade News )अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.