Talegaon Dabhade News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा निरीक्षकपदी वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस वैशाली प्रमोद दाभाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा निरीक्षकपदावर नियुक्ती झाली आहे. बुधवारी (दि. 6) पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीच्या वेळी वैशाली दाभाडे यांना संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे, मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बबनराव भेगडे, तळेगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे, ज्येष्ठ नेते विजय कोलते, महिला अध्यक्षा भारती शेवाळे, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, युवती अध्यक्षा पूजा बुट्टे, विद्यार्थी अध्यक्ष करण कोकणे तसेच सर्व सेलचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

पक्षाची ही जबाबदारी स्विकारताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार पर्यायाने पवार साहेबांचे विचार तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्यास कटीबद्ध आहे, पक्षवाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून पक्षश्रेष्टींनी दिलेल्या संधीचे नक्कीच सोनं करण्याची जबाबदारी प्राप्त झाली असल्याची प्रतिक्रिया दाभाडे यांनी यावेळी दिली. तसेच पक्षाला अभिप्रेत अशी संघटना बांधण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.