Talegaon Dabhade : इंदोरीच्या संत तुकाराम तंत्रनिकेतन प्राचार्यपदी नितीन आदक

एमपीसी न्यूज- एक्सेल एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या संत तुकाराम तंत्रनिकेतन इंदोरी मावळच्या प्राचार्यपदी नितीन नानाभाऊ आदक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक्सेल शिक्षण संस्थेचे सचिव व प्राचार्य नरसिंह शिंदे यांनी प्राचार्य पदाचा राजीनामा देऊन आदक यांची प्राचार्यपदी नियुक्ती केली.

आदक हे एम.ई इलेक्ट्रॉनिक्स असुन शिक्षणशेत्रामध्ये त्यांचा १० वर्षाचा अनुभव व औद्योगिक क्षेत्रामध्ये दोन वर्षाचा अनुभव आहे. माजी प्राचार्य नरसिंह शिंदे यांच्या हस्ते आदक यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उपप्राचार्य अविनाश डोके, पत्रकार ऋषिकेश लोंढे, संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

संत तुकाराम तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर भर देऊन विविध अस्थापना बरोबर संपर्क साधुन उचित रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष लक्ष देणार. तसेच तंत्रशिक्षणाचे महत्त्व व त्याचा प्रसार करण्यावर भर देणार असे यावेळी प्राचार्य नितीन आदक म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.